राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यावरणपूरक वृक्षतुला कार्यक्रम राबविण्यात आला. भाजयुमो जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध फळझाडांच्या माध्यमातून पालकमंत्री भोयर यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.