तेल्हारा नगर परिषद निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी पार पडले असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे यांनी मतमोजणी प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवून तेथे जॅमर बसविण्यात यावेत, तसेच हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आधिक व्यवस्था करण्यात यावी.