घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात पोहोचून सर्व उमेदवारांनी आज दि.17 नोव्हेंबर ला 2 वाजता नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शारदा दुर्गम यांनी अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षा तर्फे अर्ज सादर केला.