नागपूर ग्रामीण: डंपिंग यार्डला भीषण आग; विषारी धुरामुळे नागरिक हैराण
डिगडोह नगर परिषद क्षेत्रातील एमआयडीसी परिसरात असलेल्या डंपिंग यार्डला रविवारी भीषण आग लागली. सकाळी लागलेली आग अग्निशमन दलाने विझवली होती, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सायंकाळी ही आग पुन्हा भडकली.या आगीमुळे डिगडोह, बालाजी नगर आणि पारधी नगर परिसरात विषारी धुराचे लोट पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.