पालघर: महिला व बालविकास विभाग जिल्हा कार्यक्रमाधिकारी पदाचा व्यंकटराव हुंडेकर यांनी स्वीकारला पदभार
पालघर जिल्हा परिषद येथे महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी पदाचा पदभार व्यंकटराव हुंडेकर यांनी औपचारिक रित्या स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी मीरा-भाईंदर, अंबाजोगाई येथे बालविकास प्रकल्प अधिकारी, बीड, उदगीर येथे महिला व बालविकास अधिकारी व शासकीय मुलांचे बालपण येथे अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. प्रशासनाच्या मदतीने जनतेच्या सहकार्याने योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.