नागपूर शहर: ऑरेंज नगर येथे टी ट्वेंटी मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
19 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबरला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड t20 क्रिकेट मॅच वर सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा मार कार्यवाही करून आरोपी पवन साकोरे याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चार मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 47 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पुढील कारवाईसाठी वाटोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.