दिग्रस: जीवाची पर्वा न करता पोटासाठी मौत का कुआत झोकून देणाऱ्या रुकसाना खातूनचा आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने यात्रेत सन्मान
दिग्रस शहरातील पूजा अम्यूझमेंट येथे रोज जीवाशी खेळत थरारक स्टंट करणारी महिला कलाकार रुकसाना खातून आणि त्यांच्या धाडसी प्रयत्नांना साथ देणारे पूजा अम्यूझमेंटचे संचालक जुबेर गल्लाकाटू यांचा आज दि.५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने भावनिक सत्कार करण्यात आला. "पोटाची आग शांत करण्यासाठी मृत्यूशी खेळणारी ही माणसं खरं तर धैर्याची मूर्ती आहेत," अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांचा गौरव केला.