एमआयटी कॉलेज परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी केली अटक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 16, 2025
आज मंगळवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सातारा पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी प्रशांत राजेंद्र आवारे वय 21 वर्षे राहणार जय भवानीनगर छत्रपती संभाजीनगर या आरोपीने सातारा पोलीस ठाणे हद्दीतील एमआयटी कॉलेज परिसरामध्ये आता तलवार घेऊन हवेमध्ये तलवार फिरून विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण केली होती या प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गोले हे पुढील तपास करीत आहे.