अकोला: १३ वर्षांनंतर पुन्हा रंगणार नरनाळा महोत्सव मेळघाटच्या वनवैभव व संस्कृतीचे दर्शन घडणार; जिल्हाधिकारी वर्षा मीना
Akola, Akola | Nov 13, 2025 अकोला जिल्ह्यातील मेळघाटच्या समृद्ध वनवैभव आणि आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणारा नरनाळा महोत्सव १३ वर्षांनंतर पुन्हा आयोजित केला जात आहे. हा महोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान होणार असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने दर्जेदार कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. महोत्सवात नौकाविहार, सफारी, आदिवासी नृत्य, पक्षीनिरीक्षण, साहसी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम घडणार आहेत.