कामठी: पंधरा वर्षीय अल्पवयीन मुली बरोबर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा
Kamptee, Nagpur | Sep 24, 2025 24 एप्रिल 2018 ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीत राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर आरोपी शेरू उर्फ सोनू कुरेशी शकूर कुरेशी वय वीस वर्ष याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. व कोणाला काहीही सांगितले असे जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.