भोकरदन: राजुर गाव परिसरामध्ये चनेगाव पाटीवर 2 वेगवेगळ्या अपघातात 2 तरुणांचा गेला जीव
आज दि.11 एप्रिल 2020 वार शनिवार रोजी रात्री8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. राजुर गाव परिसरामध्ये काल दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन तरुणांचा जीव गेला आहे,यामध्ये चनेगाव पाटी परिसरात झालेल्या अपघातात करण भूमकर यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देत त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा आत्माराम निहाळ या तरुणाच्या दुचाकीला स्विफ्ट कारणे धडक देत त्याचाही या अपघातात मृत्यू झाला, या अपघाताची नोंद राजूर पोलीस चौकीत घेण्यात आली आहे.