मुखेड: भावावर अवैध दारूची केस करणा-या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करून शासकीय कामात केला अडथळ; मुखेड पोलिस ठाण्यातील घटना
Mukhed, Nanded | Oct 4, 2025 पोलीस स्टेशन मुखेड तालुका मुखेड जि.नांदेड येथे दि 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील आरोपी अंकुश माचेवाड याने यातील फिर्यादी हे आरोपीचा भाऊ पांडुरंग माचेवाड यांचे विरूद्ध अवैध दारूची केस करत असताना नमुद आरोपीने पोलिस स्टेशन मुखेड येथे येऊन फिर्यादीस धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.याप्रकरणी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक तुतूरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यामावार आज करीत आहेत.