परभणी: जिल्हा पोलिस दल व कृषि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने "वॉक फॉर युनिटी"
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हा पोलिस दल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी "वाॅक फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले. या वॉक फॉर युनिटीमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि परभणी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.