मोहाडी: बोरगाव आणी पालोरा परिसरात वाघाची दहशत, नागरिकांत भितीचे वातावरण. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
मोहाडी तालुक्यातील बोरगाव आणि पालोरा परिसरात वाघाचे वास्तव्य असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पालोरा येथील वन विभागाला मिळताच वन अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत फटाके फोडून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आज दि. 16 ऑक्टोबर रोज गुरुवारला दुपारी 2 वा. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी बोरगाव येथील नागरिकांनी केली आहे.