धामणगाव रेल्वे: जे बी पार्क येथे 134900 रुपयाचे नगदी व सोने, चांदीचे दागिने चोरी
मारुती किसन करलुके यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे मारुती हे पत्नीसह बाहेरगावी गेले असता चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील 500 रुपयाचे 200 नोटा एकूण एक लाख रुपये चिल्लर 50, 100, 200 च्या नोटा एकूण पंधरा हजार रुपये तसेच पाच ग्राम सोन्याची अंगठी जुनी वापरती किंमत अंदाजे 15 हजार रुपये व चांदीचे भांडे लहान ग्लास ,प्लेट, वाटी, तोरडया चम्मच साततोडे अंदाजे किंमत 4900 असा एकूण 134900 रू.माल चोरून नेल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.