पुर्णा: नांदेड पूर्णा रोडवर पिंपळा भत्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात ; एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
नांदेड-पुर्णा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पूर्णा तालुक्यातील पिंपळा भत्या येथे आज शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखले केले, तर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण आरोग्य केंद्र कावलगांव येथे पाठवला आहे.