दिग्रस: अतिवृष्टीच्या निर्णयाची दिवाळीच्या होळी करून शेतकऱ्यांसह खासदार संजय देशमुख यांनी चटणी-भाकर खाऊन तहसिल कार्यालयात साजरी
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाविरोधात दिग्रस येथील तहसील कार्यालयासमोर आज दि.२१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले. या ठिकाणी शासनाच्या निर्णयाची प्रतीकात्मक “होळी” करण्यात आली. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत खासदार संजय देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयात आंदोलन करत चटणी-भाकर खाऊन दिवाळी साजरी केली. या कृतीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या.