कल्याण: कल्याण येथील सिमेंट फॅक्टरीला खासदार सुरेश म्हात्रे यांचा विरोध
Kalyan, Thane | Oct 17, 2025 कल्याण शहरातील मोहने येथील एनआरसी कंपनीच्या जागेवर अंबुजा सिमेंटची फॅक्टरी उभारण्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येताच, स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. हा प्रकल्प राबविल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास, पर्यावरणास आणि नदीच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण होईल अस खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास सांगितलं असून विरोध दर्शवला आहे. तसेच या प्रकल्पाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असही ते म्हणाले.