महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (रायझिंग डे) जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी शोध घेतलेले १५ गहाळ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे मोबाईल धारकांनी जुनी कामठी पोलिसांचे आभार मानले.