आज शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे , मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त स्वरूप खारगे, लेखाधिकारी संग्राम ऱ्होरकटे व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.