रत्नागिरी : जिल्ह्यात 17 नोव्हेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरु..
सर्वांनी कुष्ठरोगाची तपासणी करून आरोग्य पथकास सहकार्य करावे..
287 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 18, 2025 जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत "कुष्ठरुग्ण शोध मोहीम “अभियान राबविण्यात येणार असून,2027 पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात "शून्य कुष्ठरोग प्रसार" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करीत आहे. या अभियानासाठी आवश्यक विभागीय समन्वय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी दालनात जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भास्कर जगताप,वैद्यकीय अधिकारी(कुष्ठरोग) डॉ परवेज पटेल,जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी बेंडकुळे आदी उपस्थित होते.