उत्तर सोलापूर: महाविकास आघाडीत माकपला शहर मध्यसह ५ जागा मिळतील; संगमनेर शासकीय विश्रामगृहात झाली बैठक
संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांची जागावाटप बाबत बैठक पार पडली.या शिष्टमंडळात पक्षाचे राज्य सचिव डॉ.उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, डॉ.डी.एल कराड,डॉ.अजित नवले , ॲड.जायभावे आदींची उपस्थिती होती. महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्यसह माकपला पाच जागा मिळतील असेही सांगण्यात आले.