अमरावती: सांस्कृतिक भवन येथे आयोजित “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शनीचा शहरवासीयांनी लाभ घ्या: मनपा आयुक्त सौम्या शर्मा
अमरावती मनपा तर्फे आयोजित “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन आज अमरावती येथील सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाले. या उदघाटन समारंभात शहरातील मान्यवर, अधिकारी, कलाकार, छायाचित्रकार, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सजविण्यात आलेले सांस्कृतिक भवन दिव्य रोषणाईने उजळून निघाले होते. या प्रदर्शनीचा अमरावती शहरवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले.