महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे भंडारा जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या नगरपरिषदा - भंडारा, तुमसर, पवनी, व साकोली - साठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आयोगाच्या घोषणेनुसार या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना १० नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे दाखल...