कल्याण: कल्याण वालधुनी येथील गुंड फिरोज मेंटल आम्हाला त्रास देत आहे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण
Kalyan, Thane | Oct 19, 2025 कल्याण वालधुनी परिसरातील कुख्यात गुंड फिरोज शेख उर्फ फिरोज मेंटल आणि त्याचा साथीदार तौसीफ सय्यद दहशत पसरवत असल्याचा आरोप माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 12च्या सुमारास केला आहे. महिलांशी छेड छाड, रस्त्यावर मारहाण, दागिने हिसकावने सारखे कृत्य फिरोज करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या संदर्भात बोलताना त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.