5 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मैत्रिणीच्या नावावरून चिडवल्याच्या रागातून पाच जणांनी एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पार्वती नगर येथे घडली. ऋतिक सावनलाल पटले असे मृत तरुणाचे नाव असून, या हल्ल्यात अन्य चार जण जखमी झाले आहेत.शनिवारी रात्री ऋतिक, त्याचा मित्र तनसू आणि मुस्तफा ऊर्फ गोलू अंसारी यांनी एकत्र मद्यपान केले. यावेळी ऋतिकने मुस्तफाला त्याच्या मैत्रिणीच्या नावावरून चिडवले.