पारगाव सुद्रिक–बेलवंडी कोठार रस्ता पुन्हा मार्गी; आमदार विक्रम पाचपुते यांची थेट पाहणी, कामाला वेग श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक ते बेलवंडी कोठार या रस्त्याच्या कामात निर्माण झालेल्या अडचणींची माहिती मिळताच आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडथळे आणि अपेक्षा समजून घेतल्या.