राजूरा: आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती व सर्व आदिवासी सामाजिक संघटनाचा २७ सप्टेंबर ला मोर्चा;राजुरा पत्रकार परिषदेत माहिती
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमाती (आदिवासी) मध्ये सामील करून घेण्याची बंजारा जातीची मागणी असंविधानिक असुन त्याला मुळचा आदिवासी समाज विरोध करीत आहे. या करीता राजुरा येथे दि.२७ सप्टेंबर ला भव्य मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकारीनि राजुरा येथील पत्रकार भवन येथे आज दि २१ सप्टेंबर ला १२ वा. आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्नल चौक येथून मोर्चाला सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गांनी फिरून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येईल.