जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान होऊन जबळपास 90% शेती पिके ही अतिवृष्टीने बाधित झाली असून जवळपास पावणे 8 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून या ठिकाणी एनजीओ सुद्धा शासनाच्या बरोबरीने काम करत असून याचाच एक भाग म्हणून शिवार हेल्प लाईन व नाम फाउंडेशन ह्या दोन संस्थानी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 600 क्विंटल हरभरा व 160 क्विंटल रब्बी ज्वारीचे बियाणे मोफत दिले असल्याची माहिती आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे जिल्हा कृषी अधीक्षक कळसाईत यांनी दिले आहेत.