अंजी मोठी व सर्कल परिसरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना अखेर गती मिळाली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अंजी मोठी, पवणुर, नरसूला, मजरा, कामठी, वाघधरा, दिग्रस, पेठ, मांडवा, बोरगाव नांदोरा, धुळवा येथे पांदण रस्ते, शाळांच्या सुरक्षा भिंती, डांबरीकरणाचे रस्ते अशा विविध कामांना मंजुरी मिळाली आहे.