वणी: महसूल भवन येथे पार पडली पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत सभापतीपद एस टी महिलेसाठी राखीव
Wani, Yavatmal | Oct 13, 2025 वणी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज महसूल भवन येथे पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीत 10 गणांचे व 5 गटाचे आरक्षण जाहीर झाले. पं. स. मध्ये 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमाती (ST) साठी कायर आणि घोन्सा हे दोन गण, अनुसूचित जाती (SC) साठी राजूर हे एक गण, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी तरोडा आणि शिंदोला या दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या. सभापतीपद एसटी महिलांसाठी राखीव असल्यान