सेनगाव: संतप्त शेतकऱ्याचा महावितरण कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
सेनगांव तालुक्यातील वटकळी येथील संतप्त शेतकऱ्याने विद्युत जोडणी मिळण्यास टाळाटाळ होत असल्याने महावितरण कार्यालयासमोर चक्क आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वटकळी येथील शेतकरी अमृता नाथराव शिंदे यांनी कृषी पंप विद्युत जोडणीसाठी रीतसर मागणी करूनही त्यांना महावितरण कार्यालयाकडून टाळाटाळ करत विद्युत जोडणी मिळत नसल्याने त्यांनी महावितरण कार्यालयाला लेखी निवेदन देऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.