चंद्रपूर: काँग्रेसकडून चंद्रपूर महानगरपालिकेसाठी इच्छुकांकडून 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन आज दि 22 ऑक्टोबर ला 12 वाजता चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.