सातारा: किल्ले अजिंक्यताऱ्याच्या सुंदरबनात आढळून आले फुलपाखरु नव्हे पतंग आहे, पर्यावरण तज्ञ सुनील भोईटे यांचा दावा
Satara, Satara | Sep 21, 2025 सह्याद्रीमध्ये विविध प्रकारचे जीवजंतू आढळून येतात. साताऱ्यातील अनेक संशोधक हे त्याचे संशोधन करत असतात. असेच साताऱ्यातील एक कुटुंब फिरण्यासाठी किल्लें अजिंक्यताऱ्यावर गेलेले असताना त्यांना सर्पाच्या तोंडांची छटा असलेले फुलपाखरु सुंदरबनात आढळून आले. त्याचा व्हिडीओ रविवारी सकाळी १० वाजल्यापासून व्हायरल झालेला असून या फुलपाखराची चर्चा होत आहे.फुलपाखरांचे विविध प्रकार साताऱ्याच्या महादरे भागात आढळून येतात. ते फुलपाखरु नसून तो पंतग आहे, असा दावा पर्यावरण तज्ञ सुनील भोईटे यांनी केलेला आहे