अकोला: गजानन महाराज मंदिराजवळ वृद्धाचा मृत्यू, रवी सरदार यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह जिएमसी ला हलवला
Akola, Akola | Oct 21, 2025 दि. २१ ऑक्टोबर रोजी अग्रवाल हॉस्पिटलसमोर, गजानन महाराज मंदिराजवळ एका अज्ञात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष (युवा आघाडी) रवी सरदार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सरदार यांनीच ही माहिती रामदासपेठ पोलिसांना कळवली. पोलीस अधिकारी विजय सावदेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्या वेळी उपस्थित काही नागरिकांच्या मदतीने आणि रवी सरदार यांच्या पुढाकाराने मृतदेह GMC रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलवण्यात आला. अशी माहिती सायं