धर्माबाद शहरातील बासर जाणाऱ्या रोडवरील आंध्र बस स्टॅन्ड रोडवरील मुख्य रस्त्यावर नवीनच झालेल्या गुळगुळीत रोडचे खोदकाम करीत ह्या रोडच्या मधोमध आता खड्डा तय्यार करून इथे नवीन पोलची निर्मिती करण्यात येत असून ह्या ठिकाणी धर्माबाद शहरात प्रवेश ये जा करणाऱ्या वाहन धारकांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे विशेष म्हणजे हे काम सुरु असल्याने आवश्यक ते वाहनधारकांसाठी कुठलेही सुरक्षा अथवा काम सुरु असल्याचे बोर्ड अथवा फलक देखील लावले नसल्याने रात्री बे रात्री ह्या ठिकाणी अपघात होऊ शकतो.