वर्ध्याच्या निम्न वर्धा प्रकल्प क्षेत्रात विना परवाना सुरू असलेल्या अवैध मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभाग व आर्वी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत 80 किलो तिलापिया व पडन जातीचे मासे, मासेमारी साहित्य आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध मासेमारीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.ही माहिती दिनांक 24 डिसेंबर रो