रामटेक: टुयापार येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरला बिबट; रेस्क्यू करून केले जेरबंद
Ramtek, Nagpur | Mar 22, 2026 आदिवासी बहुल देवलापार क्षेत्रात आता बिबट्याने शेत शिवार,गाव शिवाराची सीमा ओलांडून चक्क गावातच प्रवेश केला आहे. शनिवार दि. 21 मार्चला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एका बिबट्याने देवलापार (प्रादेशिक) अंतर्गत येणाऱ्या टूयापार येथील शेतकरी मनोज सांगोळे यांच्या घरालगतच्या पशूंच्या गोठ्यातच प्रवेश केला. बिबट सायंकाळपर्यंत गोठ्यातच दडून बसला होता. वनविभागाद्वारे सायंकाळपर्यंत रेस्क्यू करण्यात आल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. त्याला सुरक्षित पकडून ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर नागपूरला पाठविले.