तुमसर: बाळापुर ते पवनारखारी रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने लपलेल्या युवकावर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील मौजा डोंगरी माईन्स परिसरात दि. 29 नोव्हेंबर रोज शनिवारला रात्री 8 वा.च्या सुमारास गोबरवाही पोलीस गोष्टीवर असताना त्यांना बाळापुर ते पवनारखारी रस्त्यावर रात्रीच्या अंधारात एक युवक लपलेल्या स्थितीत आढळून आला. अनिकेत नीलकंठ वाढीवे वय 25 वर्षे रा. डोंगरी बुजुर्ग असे आरोपी युवकाचे नाव असून तो डोंगरी माईन्स प्रतिबंधित क्षेत्रातून खनिज संपत्ती व इतर मौल्यवान वस्तू चोरी करण्याच्या उद्देशाने आढळल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.