समुद्रपूर: वाकसुर वणा नदी पत्रातुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ५ जणांन विरोधात मोठी कारवाई:४१ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
समुद्रपुर पोलिसांनी २८ एप्रिलला ५ वाजताच्या सुमारास मौजा वाकसुर शिवारातील वणा नदी पत्रातुन अवैध रित्या जेसीबीच्या साहाय्याने ट्रक्टरमध्ये काळी वाळू भरून चोरून वाहतुक करणाऱ्या युवराज रामहरी कारमोरे रा. कानकाटी,श्रावण रामचंद्र सिंडाम राहणार हरणखुरी ,प्रकाश वसंत पाटील रा.कानकाटी, नरेश विठलराव धोटे ,दिनेश श्रावण सराटे दोन्ही राहणार रामनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ४१ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.