म्हसळा: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत म्हसळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न
Mhasla, Raigad | Oct 25, 2025 आज शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत म्हसळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, ध्येय-धोरणे, जनतेच्या प्रलंबित समस्या व मागण्यांसह विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी परिवारातील सदस्यांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वसमावेशक भूमिकेतून व शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांतून पुढील काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत चिंतन करण्यात आले. यावेळी बैठकीस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.