दिग्रस: नगर परिषद निवडणूक मनसे स्वबळावर लढणार, दिग्रसच्या विश्रामगृह येथे मनसेची बैठक संपन्न
दिग्रस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान दिग्रस शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सुकोडे आणि दिग्रस तालुका अध्यक्ष प्रशांत गौरकर यांनी जाहीर केले की, दिग्रस नगर परिषद निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे.