जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'आंतर-संस्था बुद्धिबळ स्पर्धा - २०२६' चे अत्यंत दिमाखात आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल येथील भागुबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजने या स्पर्धेचे यजमानपद भूषवले. अवघ्या चार दिवसांच्या नोंदणी कालावधीत ९७ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. ही स्पर्धा तीन वयोगटांत पार पडली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव केला.