पाटोदा: गरमाथा परिसरात बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन
Patoda, Beed | Nov 9, 2025 पाटोदा तालुक्यातील गारमाथा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना संदीप लवांडे यांच्या शेतातील असून, सकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या काही मजुरांनी बिबट्याला फिरताना पाहिले. त्यांनी तत्काळ ही माहिती गावातील नागरिकांना आणि वन विभागाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या काही वेळ शेत परिसरात थांबून नंतर शेजारच्या डोंगराकडे निघून गेला. मात्र त्याच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे.