कोरेगाव: नगरविकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रहिमतपूर नगरपरिषदेच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर; आ. मनोजदादा घोरपडे
रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या नगरविकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी रहिमतपूर नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसाठी मिळाला असून, या कामांच्या मंजुरीमागे सततचा पाठपुरावा आणि प्रयत्न यशस्वी ठरले आहेत, अशी माहिती कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर रविवारी रात्री आठ वाजता माहिती दिली आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या या निधीअंतर्गत शहराचा विकास केला जाणार आहे.