धानोरा: धानोरा नगरपंचायत पदाधिकारी व नागरीकांचा वारंवार खंडीत विजपूरवठ्यामूळे विद्यूत वितरण कंपनी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
धानोरा - तालूक्यात व शहरात विद्यूत वितरण कंपनीचा वतीने करण्यात येणारा घगूती व कृषी पंपाचा विद्यूत पूरवठा वारंवार खंडीत होणे कमी दाबाचा पूरवठा यामूळे विज ग्राहक त्रस्त झाले असून या विरोधात आज दि.२९ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी १ ते ४ वाजे दरम्यान नगरपंचायत पदाधिकार्यांचा नेतृत्वात नागरीकांचा भव्य आक्रोश मोर्चा विज वितरण कार्यालय धानोरा येथे धडकला.