परभणी: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आक्रमक दोषींवर कठोर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यां मागणी
बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे, एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून यशाच्या उंबरठ्यावर उभी असलेली महिला डॉक्टर समाजातील काही गिधाडांची शिकार ठरली, ही आत्महत्या नाही तर ही एकप्रकारे हत्याच आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना आज सोमवार 27 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता केली.