विदर्भाच्या मातीचा, परंपरेचा आणि क्रीडासंस्कृतीचा गौरव करणारा ऐतिहासिक क्षण आज जळका पटाचे येथे अनुभवास आला. तब्बल १११ वर्षांनंतर जळक्याला विदर्भातील पहिला मानाचा पट मिळाला असून, विदर्भ केसरी जंगी शंकर पट स्पर्धेचे भव्य उद्घाटन आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हा क्षण जळकावासीयांसह संपूर्ण विदर्भासाठी अभिमानास्पद ठरला.शंकर पट ही केवळ स्पर्धा नसून शेतकरी संस्कृतीशी नाळ जोडलेली, परिश्रम, जिद्द, ताकद आणि शिस्त यांचे प्रतीक असलेली परंपरा आहे..