स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोनपितरे यांच्या सतर्कतेमुळे भंडारा जिल्ह्यात रेती चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८ वाजण्याच्या सुमारास एकलारी ते नेरी रोडवर पेट्रोलिंग करत असताना, टिप्पर क्रमांक एम.एच. ४० बी.जी. ९५५८ मध्ये पास परवान्याच्या क्षमतेपेक्षा अंदाजे ३ ब्रास (किंमत १८,०००/- रु.) अतिरिक्त रेती आढळून आली. याप्रकरणी चालक १) रोहीत दिपक भोयर (वय २७, रा. गोपीवाडा), २) क्लिनर साहील नत्थु भोयर (वय २२, रा. गोपीवाडा), ३) टिप्पर मालक उमेश शिगंनजुडे