भंडारा जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पातील कथित कोट्यवधी रुपयांच्या अपहाराच्या आरोपांवरून राजकारण तापले असून, या प्रकल्पाचे काम बुडीत क्षेत्रात होत असल्याचीही तक्रार आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडारा येथे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, त्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले.